Aurangabad AMC Sidharth Zoo  
छत्रपती संभाजीनगर

गोष्टीतला करकोचा आला सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयात! 

मधुकर कांबळे

औरंगाबाद -  सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील शक्‍ती आणि करिष्मा ही पिवळ्या पटेरी वाघाच्या जोडीची मंगळवारी (ता.11) पाठवणी करण्यात आली. तर त्यांच्या बदल्यात मुंबईहून आलेल्या करकोचा आणि चितळांची सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयात भर पडली आहे. 

वाघांना लहानपणी बाटलीतुन दूध पाजून त्यांना वाढवलेल्या केअरटेकरांना वाघाची जोडी जाताना गहीवरुन आले. मुंबईच्या वीर माता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात हे दोन वाघ पाठविण्यात आले. 

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात वाघ ठेवण्याची क्षमता ठरवून दिली आहे. त्यानुसार प्राणिसंग्रहालयात 9 वाघ ठेवण्यास मान्यता आहे. एप्रिल महिन्यात समृद्धी वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला. त्यामुळे वाघांची संख्या 12 वर पोहचली आहे. 

तत्पूर्वी मुंबई महापालिकेने वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात दोन वाघ मिळावेत, अशी मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती. त्यानुसार सिध्दार्थ उद्यानातील शक्ती-करिष्मा ही पिवळ्या वाघाची जोडी मुंबई पाठविण्यासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे परवानगी मागितली. ही परवानगी प्राप्त झाल्यानंतर वन विभागाकडून प्राण्यांची वाहतूक करण्याचा परवाना घेण्यात आला. त्यानंतर वाघाची जोडी घेऊन जाण्यासाठी मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले प्राणीसंग्रहालयाचे कर्मचारी वाघाची जोडी घेवून जाण्यासाठी दुपारी शहरात दाखल झाले होते. 

सिध्दार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी सांगीतले, की मुंबई येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयाचे पशुधन विकास अधिकारी डॉ. देवकुमार सिरसाट यांच्यासोबत सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. त्यानंतर वाघाच्या जोडीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सायंकाळपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले, शिवसेनेचे संपर्कनेते विनोद घोसाळकर, स्थायी समितीच्या सभापती जयश्री कुलकर्णी, सभागृह नेता विकास जैन यांच्या उपस्थितीत वाघाच्या जोडीला पिंजऱ्यात सोडून हे पिंजरे वाहनात ठेवण्यात आले. महापौर घोडेले यांनी वाहनाला झेंडी दाखवुन रवाना केले. 

केअरटेकरना झाले अश्रू अनावर 

शक्ती-करिष्मा वाघांची देखभाल व काळजी घेणारे कर्मचारी चंद्रकात काळे व महमंद झिया यांनी या दोन्ही वाघांची लहानपणापासून त्यांची देखभाल केली. या जोडीला रवाना करताना या दोन्ही कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. दोघांच्या डोळयातील अश्रू पाहताच पशुधन पर्यवेक्षक संजय नंदन, सोमनाथ मोटे, महमंद जफर, प्रविण बत्तीसे, सुरेश साळवे या कर्मचाऱ्यांनाही गहिवरुन आले. 

वाघांच्या बदल्यात करकोचा

वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयातील दोन चितळांच्या जोड्या आणि एक नर आणि दोन माद्या करकोचा वाघांच्या बदल्यात देण्यात आले. करकोचा सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयात आल्याने आता लहानपणी शाळेत ऐकलेली करकोचा आणि कोल्ह्यांच्या जेवणाच्या गोष्टीतील करकोचे बाळगोपाळांना प्रत्यक्ष पहायला मिळणार आहेत. महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले , औरंगाबाद महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील पिवळया वाघाची जोडी मुंबई येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात जात असल्याचे समाधान आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT